अरे देवा ! एका मांजरामुळे तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गायब; काय आहे प्रकरण ?

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऐकावं ते नवलंच आहे. चक्क एका मांजरीमुळे तब्बल ६० हजार ग्राहकांची वीज गायब झाली. पिंपरी-चिंचवड या शहरातील भोसरी एमआयडीसी येथील सब स्टेशनच्या ट्रान्सफार्मरवर मांजर चढले होते, यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ६० हजार ग्राहकांची वीज गेली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेमुळे भोसरी येथील औद्योगिक क्षेत्राला याचा फटका बसला आहे. भोसरी एमआयडीसी येथे २२० केव्हीचे सब स्टेशन आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास याठिकाणी मांजर चढली आणि शॉर्टसर्किट झालं. त्यामुळे १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास बिघाड झाला आणि लोड निर्माण झाला, अशी माहिती महापारेषण अधिकारी ज्योती चिपटी यांनी दिली आहे.

तसेच त्या म्हणाल्या की, “औद्योगिक असोशियन सोबत चर्चा करून चक्राकार लोडशेडिंग सुरू केली आहे. ग्राहकांनी सहकार्य करावं, वीज जपून वापरावी उन्हाळा असल्याने विजेची मागणी वाढली आहे. या घटनेमुळे एक ट्रान्सफॉर्मरवर लोड आहे, जपून वीज वापरा” असं आवाहन त्यांनी केलं.

महापारेषणकडून बिघाड झालेल्या १०० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची सध्या तपासणी सुरु आहे. त्यामध्ये हा ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यास आल्यास तो बदलण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे महापारेषणच्या २२० केव्ही उपकेंद्रात सध्या सुरु असेलल्या एकमेव ७५ एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून त्यावरील १६ वीजवाहिन्यांसह सध्या बंद असलेल्या १० वीजवाहिन्यांना देखील पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा द्यावा लागणार आहे.

दरम्यान या कालावधीत भोसरी विभागातील वीजपुरवठ्याची स्थिती अधिकच विस्कळीत होण्याची शक्यता आहे. एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्याने भोसरी विभागात चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करावा लागणार आहे. मात्र अशी स्थिती १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यासच उद्भवू शकते अशी माहिती महापारेषणकडूनन देण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.