जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरात एका भागात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीची क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सुमारे १ लाख ९७ हजार ८९७ रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात महिलेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीर या भागात २६ वर्षीय तरूणी ही आपल्या आई, वडील व भाऊ यांच्यासह राहते. सदर तरुणी पुण्यातील एका नामवंत कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीला आहे. त्यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असून त्यांनी हे कार्ड मागील दोन महिन्यापासून घेतले आहेत.
७ मार्च रोजी तरूणी घरी असताना त्यांना दुपारी एका अनोळखी नंबरवरून फोन आला. समोरील महिला हिंदी भाषेत म्हणाले की, ‘आपको क्रेडिट कार्ड की सवलत चाहिये क्या, चाहिये होगी तो मै आपको ५० हजार रुपये बिन भेज दुंगी’, असे सांगितले. त्यावर तरूणीने सांगितले की, मैने ऐसी कोई भी सर्विसेस नही ली है असे सांगितले. त्यानंतर समोरील महिलेने विश्वासात घेऊन तरूणीकडून मोबाईलवर ऑप्शन दिले. त्याप्रमाणे तरूणीने सांगितल्याप्रमाणे प्रोसेस केले. त्यानंतर एक ओटीपी आला व आलेल्या ओटीपी त्यांना सांगितला.
दरम्यान २३ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास तरूणी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर आयसीआयसीआय बँकेचा मेसेज आला. त्यात त्यांनी एकूण १ लाख ९७ हजार ८९७ रुपयांचे ट्रांजेक्शन झाल्याचे बिल आले. यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहे.