तुरीला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ५०० रुपये दर

0

 लोकशाही विशेष लेख

 

देशातील अनेक बाजारात तुरीच्या दरात आज क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा दिसली. तूर डाळीला उठाव असल्यानं प्रक्रिया उद्योगाची खरेदी वाढली आहे. तर व्यापाऱ्यांनी तुरीची चांगली उचल केली. त्यामूळे आजही तुरीला चांगला उठाव मिळाला. आज तुरीला सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तुरीचे दर पुढील काळातही तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

 

हरभरा दरात काहीशी सुधारणा

देशातील काही बाजारात हरभरा दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. हरभरा दर सध्या ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. नाफेडची खरेदी आता गती घेत आहे. तर नुकत्याच झालेल्या पावसाने अनेक राज्यांमध्ये पिकाचे नुकसान केले. त्यामुळं उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याचा हरभरा बाजाराला आधार मिळू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

लसणाचे दर तेजीत

राज्यातील बाजारात लसणाचे दर तेजीत आहेत. सध्या बाजारातील आवकही मर्यादीत दिसत आहे. पण उठाव चांगला आहे. देशात सध्या लग्नसराई आणि सणांचा काळ आहे. त्यामुळं लसणाची मागणी वाढली.त्यामुळं लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. लसणाचे दर पुढील काळातही तेजीतच राहू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

 

सर्वच शेतीमालांच्या दरात घट

आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही कापसाचे दर सध्या दबावात आहेत. अमेरिकेतील दोन बॅंका संकटात आल्यानंतर शेतीमालाच्या बाजारात नरमाई दिसली. कापसासह सोयाबीन, खाद्यतेल, मका आणि गहू या सर्वच शेतीमालांच्या दरात घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर जाणवत आहे. त्यातच मार्च महिन्यातील कापसाची आवक जास्त आहे.बाजार समित्यांधील दर प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ६०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळत आहे. एप्रिलच्या मध्यानंतर कापूस आवक कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.