किनगाव येथील वृद्ध व्यक्तीचा निर्घृण खून

0

किनगाव चुंचाळे रस्त्यावरील घटना ; परिसरात खळबळ

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क

किनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भिमराव शंकर सोनवणे (वय ६० ) रा. किनगाव असे या मयत वृद्धांचे नाव आहे.भिमराव शंकर सोनवणे यांचा रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरडुन नंतर दगडाने ठेचुन खुन केल्याची घटनासमोर आली आहे . चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली धारधार हत्याराने गळा कापुन दगडाने ठेचुन अत्यंत र्निघुण खुन झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली असुन या घटनेमुळे किनगाव व चुंचाळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे ,

घटनेचे वृत्त कळताच फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर , पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पयक घटनास्थळी पहोचले असुन, घटनास्थळी स्वानपथकास बोलविण्यावा आले आहे . मागील चार ते पाच महीन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात खुन झालेल्या व्यक्तिचा मुलगा विनोद भिमराव सोनवणे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा करण्यात येत आहे. हा खून कुणी व कशासाठी झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.