मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षक पदी नागेश मोहिते यांची नियुक्ती…

0

 

मुक्ताईनगर,लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

गेल्या तीन वर्षांपासून मुक्ताईनगर तालुक्याला कायमस्वरूपी असा पोलीस अधिकारी नव्हता. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रभारीराज सुरू होता. मात्र आता नागेश मोहिते हे मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक म्हणून लाभलेले आहेत.

2006 च्या बॅचचे अधिकारी असलेले नागेश मोहिते यांनी सोलापूर ग्रामीण, नागपूर, नाशिक आणि आता मुक्ताईनगर या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे. अशा विविध ठिकाणी काम केलेल्या मोहिते यांनी, गडचिरोली येथील नक्षलवादी भागात देखील काम केलेलं आहे. मुक्ताईनगर तालुका आणि त्याची भौगोलिक परिस्थिती पाहता तीन टप्प्यांमध्ये हा भूभाग विभागला गेलेला आहे. अंतुर्ली परिसर, कुर्हा परिसर आणि मुक्ताईनगर परिसर त्यातल्या त्यात मध्यप्रदेश आणि बुलढाणा जिल्ह्याची सीमा लागून असलेला हा तालुका असल्याने, या ठिकाणी विविध प्रकारच्या तस्करी आणि विविध प्रकारचे क्राईम  होण्याची शक्यता नेहमी असते. त्यामुळे हा तालुका नेहमी अलर्ट मोडवर असतो. तसेच राजकीय दृष्ट्या हा तालुका अतिशय संवेदनशील असल्याने या तालुक्यामध्ये अधिकारी येण्यास नाखुश असतात. त्यामुळे आगामी काळात मोहिते हे आपली कशी कामगिरी बजावतात यावर तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.