राज ठाकरेंनी साधलं अचूक टायमिंग…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

वर्षा बंगल्यावर आज भाजप आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते तसंच आमदारांच्या स्नेहभोजनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम असतांना. या कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. राज ठाकरे यांनी अचूक टायमिंग साधलं आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राज ठाकरे गेले आहेत. वर्षा बंगल्यावरच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे गेले असले, तरी त्यांच्या या टायमिंगची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. तसंच मागच्या काही दिवसांमध्ये भाजप नेतेही अनेकवेळा राज ठाकरेंच्या घरी गेले होते. तेव्हापासून या तिन्ही पक्षांमध्ये होत असलेल्या जवळीकतेची चर्चा सुरू झाली आहे. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांचा मुंबई दौरा संपवून पुन्हा दिल्लीला गेले. या दौऱ्यात अमित शाह यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. अमित शाह यांच्या मिशन मुंबईच्या रणनितीनंतर एकाच दिवसात राज ठाकरे भाजप-शिवसेनेच्या बैठकीवेळी वर्षावर जात असल्यामुळे पुन्हा एकदा तिन्ही पक्षांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.