धक्कादायक; शहरात २० वर्षीय तरुणीवर बलात्कार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

शहरात अपराधाचे प्रमाण हे कमालीचे वाढलेले दिसून येत आहे. त्यात छोट्यामोठ्या चोरी, मारामारी, अगदी खुनाचे प्रमाणही वाढल्याचे अलीकडे निदर्शनास आले आले, त्यात शहरातील तरुणीही सुरक्षित नसल्याचे चित्र आहे. एका २० वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरात घडल्याचे उघडकीस आली आहे. त्यात आरोपी विनोद सुकलाल भोळे (रा.सदोबा नगर, जळगाव) याच्याविरुद्ध मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ सप्टेबर रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत ही घटना घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, पिडीत तरुणी एका महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असून. पंधरा दिवसापूर्वीच तिच्या आईचे आजारपणामुळे निधन झाले आहे. १ सप्टेबर रोजी वडिलांची रात्रपाळी ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते तर पिडीत तरुणी एकटीच घरी होती. विनोद भोळे याच्याशी पिडीत कुटुंबाचे जवळचे संबंध होते. या काळात त्याची पत्नी व दोन मुलं गावाला गेलेले होते. त्यामुळे पीडितेकडून त्याला जेवणाचा डबाही मिळत होता.

१ सप्टेबर रोजी रात्री ११ वाजता भोळे हा पीडितेच्या घरी गेला. दरवाजा उघडायला लावला. घरात आल्यावर चाकूचा धाक दाखवून तो तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. घरात दोन वेळा त्याने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर एक तासाने तरुणीची सुटका केली. यावेळी त्याने डाव्या हातावर चाकू मारल्याने दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीने मंगळवारी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार भोळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.