पेटीएमवर कारवाईनंतर पेटीएम ॲप बंद होणार का ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई करत रिझर्व्ह बँकेने ऑनलाईन पेमेंट ॲप पेटीएमला मोठा धक्का डोळा आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या अनेक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. RBI ने २९ फेब्रुवारीनंतर टॉप अप ते क्रेडिट ट्रान्झॅक्शनपर्यंत अनेक सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आरबीआयच्या या कारवाईनंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम आहे. पेटीएम बंद होणार का ? पेटीएमच्या फास्टॅगचे काय होणार? वॉलेटमध्ये ठेवलेले पैसे कसे वापरणार? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई का करण्यात आली ?
पेटीएम पेमेंट्स बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पेटीएम विरोधात कठोर निर्णय घेण्यात आला.

पेटीएम बंद होणार का?
आरबीआयची ही कारवाई पेटीएम ॲपवर नाही तर पेटीएम पेमेंट बँकेवर केली आहे. म्हणजेच, जर तुम्ही पेटीएम ॲप वापरत असाल आणि पेटीएम पेमेंट बँकेकडून सेवा घेत नसाल तर ॲपवर कोणताही फरक पडणार नाही. 29 फेब्रुवारीनंतरही तुमचे पेटीएम ॲप पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.