धुळ्यात पठाण चित्रपटाला विरोध ; फाडले पोस्टर्स

0

लोकशाही न्युज नेटवर्क
धुळे शहरात बजरंग दल आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून जोरदार निदर्शने करण्यात येऊन पोस्टर्स फाडण्यात आली. बजरंग दलाने धुळे शहरातील ज्योती टॉकीज आणि ॲडलब सिनेमाबाहेर आंदोलन केले. मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये पठाण चित्रपट चालू न देण्याची धमकी दिली.

शहरातील ॲडलब चित्रपटगृहात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचा निषेध करत पोस्टर फाडले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. चित्रपट उशिराने सुरू झाल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, शाहरुख चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर येत आहे, पण बायकॉट ट्रेंडनंतर या चित्रपटातील बेशरम रंग गाण्यामुळे चित्रपटाला विरोध होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.