पारोळा पोलिसांचा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान…

0

 

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोलनाका जाळपोळ प्रकरणी पारोळा पारोळा पोलीसांनी गुन्ह्याचा कमी कालावधीत छडा लावल्याची दखल जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी घेतली. त्यांनी पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोल नाका जाळपोळ प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करणाऱ्या पारोळा पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह पथकाचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार सुनील हटकर, दीपक अहिरे, आशिष गायकवाड यांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला. दरम्यान, १७ मार्च रोजी धुळे येथील आझाद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत संशयित आरोपी प्रीतेश ऊर्फ सोनू गुजर यास पारोळा पोलीसांनी अटक केली. त्याचाकडून गुन्ह्यातील इतर चार संशयितही निष्पन्न झाले होते. त्यावरून पारोळा पोलिस निरीक्षक सुनील पवार, सुनील हटकर, दीपक अहिरे, आशिष गायकवाड यांनी सापळा रचून आकाश गुजर, अजय पवार, तुषार बागुल या तिघांना अटक केली.
या कामगिरीची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पारोळा पोलिसांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.