Wednesday, August 10, 2022

पारोळा नगर परिषदतर्फे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

- Advertisement -

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत पारोळा नगर परिषदेमार्फत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ (Waste To Use) वस्तूंचे प्रदर्शन कै. ह. ना. आपटे मोफत नगर पालिका वाचनालयात आयोजित करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

सदर कार्यक्रम ज्योती भगत पाटील प्रशासक तथा मुख्याधिकारी न.प. पारोळा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभांगी मोहरीर यांची स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत ब्रँड अम्बेसीडर म्हणुन तर माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत अनिकेत बागुल यांची पर्यावरण दूत म्हणून नेमणुक करण्यात आली. सदर कार्यक्रमात पारोळा शहरातील विविध शैक्षणिक संस्था व विध्यार्थानी उस्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच उपस्थित मान्यवरांचा वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले.

सदर कार्यक्रमात विद्यार्थांनी टाकाऊ वस्तूंपासून फोटो फ्रेम, फ्लॉवर पॉट, पेन स्टँड, फुलदाणी इत्यादी टिकाऊ वस्तू तयार करून प्रदर्शनात माही जैन, कोमल जैन, सलोनी जैन, श्रुती मालखेडे, ईशा मालखेडे, करण मल्हार, शौर्य पाटील, कोमल जैन, स्नेहल शाह, मनश्री पवार, निकिता वाणी, दिव्या पाटील, कार्तिक वाणी, प्रतीक पाटील, डॉ. प्रदीप औजेकर, वंशिका पाटील, चिराग पाटील, हार्दिक बडगुजर, प्रणव महाजन, आदी जैन यांनी सहभाग नोंदविला.

सर्व सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी शुभांगी मोहरीर व अनिकेत बागुल तसेच प्रा. औजेकर यांनी विद्यार्थी व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेऊन करण्यात आली. याप्रसंगी कु. संघमित्रा संदानशिव, कार्यालयीन अधिक्षक माझी वसुंधरा अभियान २.०, पंकज महाजन नोडल अधिकारी स्वच्छ सर्वेक्षण २०२२, कृणाल सौपुरे, अभिषेक काकडे, योगेश तलवारे, राहुल साळवे, रवींद्र पाटील, हिम्मत पाटील, अभिजित मुंदाणकर, रवींद्र लांबोळे, अशोक लोहार, अक्षय सोनवणे आदी सर्व न.प. कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत महाजन सहा. प्रकल्प अधिकारी यांनी केले

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या