पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा तालुक्यातील चोरवड विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीतील वादातून सरपंच व उपसरपंच पती यांच्या गटात तुंबळ हाणामारी झाली. यात वरील दोघे जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही गटातील ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चोरवड ता. पारोळा येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता घडली.
सरपंच राकेश रमेश पाटील व उपसरपंच शैला किरण पाटील या दोन्हींच्या गटामध्ये कोयता, लोखंडी धारदार शस्त्र, लाठ्या -काठ्या घेऊन हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले आहे.
आज दिनांक 26 रोजी विकास सोसायटीसाठी मतदान होत आहे. यासाठी गावात कडेकोट पोलीस बंदोबस्तात लावण्यात आला आहे. तसेच या निवडणुकीत एका उमेदवाराचा अर्ज परस्पर मागे घेतल्याच्या कारणावरुन दोन जणांविरुद्ध १० दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.