जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या वतीने दिमाखात संपन्न झाली. काव्यरत्नावली चौकात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती शाहू राजांचे कार्य हे मानवी स्वातंत्र्याचे कार्य होते. मानवी स्वातंत्र्यात राजकीय स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य यांचा समावेश होतो. निव्वळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोग नाही, तर प्रत्येक माणसाला न्यायाने जगता आलं पाहिजे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आग्रह राजर्षि शाहू महाराज यांनी आयुष्यभर जोपासला. आपल्या संस्थानातील प्रजेसाठी मानवी स्वातंत्र्याचा हक्क प्रत्येक नागरिकास मिळवून दिला. सामाजिक न्यायाची, सामाजिक लोकशाहीची व्याख्या कृतीतून मांडली. मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा मांडणारा हा द्रष्टा राजा होता. सर्वगामी, सर्वस्पर्शी कार्य करणारा आणि उक्ती आणि कृतीची सांगड घालणारा हा अद्वितीय राजा !
कितीही बिरूदं लावली तरी त्यांची उंची चार अंगुळे उंचच राहते. त्यामुळे या राजाचे स्मरण मानवी जीवनाच्या इतिहासात महत्त्वाचे आणि ऐतिहासिक आहे.असे प्रतिपादन त्यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला विजयकुमार मोरया उपअभियंता यांनी माल्यार्पण केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन संघर्षावर जीवन संघर्षावर विचार मांडले. डॉ. मिलिंद बागुल, शिरपुरे आप्पा, रमेश सोनवणे, महेंद्र केदारे, नगरसेवक सुरेश सोनवणे, दिलीप सपकाळे, प्रा.चंद्रमणी लभाने सर, राजेश गोयल, सोमा भालेराव, दिलीप भाऊ सपकाळे, फारुख कादरी, फईम पटेल, बी.जी बोदडे, श्रीकांत बाविस्कर, जगदीश सपकाळे, समाधान सोनवणे, संजय सपकाळे, बाबुराव वाघ, दिनकर सोनवणे, उत्तम सपकाळे, प्रा. प्रितीलाल पवार, हरिचंद्र सोनवणे, अमोल कोल्हे, श्रीकांत बाविस्कर, सतीश सुर्वे, सुधाकर पाटील, विकास तायडे, सरपंच सतीश बिराडे, संदीप कोळी, गौतम सोनवणे, पंकज सोनवणे, रवींद्र मोरे, शिरीष अडकमोल, सुगदेब नाथ, संतोष सपकाळे, विजय चौधरी, युवराज वाघ आणि समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.