किल्ल्यांच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा येथील पुरातन भुईकोट किल्याची झालेली दुरावस्था सुधारुन किल्याचे पावित्र्य राखण्यासाठी आणि संवर्धन होण्यासंदर्भात जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

यात किल्याची डागडुजी करून दुरुस्ती करणे, किल्याच्या भिंतीवर उगवलेले झाडे, दरवाज्याची झालेली दुरावस्था, किल्ल्यांच्या आतमधून बाहेरून साफसफाई करणे, ड्रेनेजची व्यवस्था करणे, किल्ल्यांत विनाकारण भटकणाऱ्या किंवा मद्यपान अगर बेशिस्तीने वागणाऱ्यांवर कायदेशीर सक्त कारवाई करण्याचे आदेश मा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या आढावा बैठकीत दिले आहेत.

या बैठकीस पारोळा पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, पारोळा तहसीलदार अनिल गवांदे, पारोळा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत, कार्यकारी अभियंता अमळनेर, प्रशांत जुवेकर हिंदू जनजागृती समितीचे, डॉ. अभय रावते, किल्ले संवर्धक राजश्री देशपांडे धुळे येथील निखिल कदम हे या आढावा बैठकीस उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.