सावधान.. तुम्ही पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस तर घेत नाहीत ना?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. बहुतांश लोकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी लक्षणे दिसत आहेत. अशी लक्षणे दिसल्यानंतर बहुतेकजण पॅरासिटामॉल घेतात. औषधांचा डोस प्रत्येक व्यक्तीची आजारांची पार्श्वभूमी, वजन आदी गोष्टींवर ठरतो. त्यामुळे पॅरासिटामॉल काळजीपूर्वक वापरा आणि त्याचा अतिरेक नको, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फॅमिली डॉक्टरांना विचारल्याशिवाय, त्यांच्याकडून तपासणी करून घेणे योग्य ठरते. इम्युनिटी बूस्टर गोळ्या, अँटिबायोटिक गोळ्या स्वतःच्या मनाने घेतल्यास यकृतावर, मूत्रपिंडावर विपरीत परिणाम होतात. ॲलोपॅथीप्रमाणेच होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक औषधेही केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवायची म्हणून न घेता आपल्या शरीराला योग्य ठरतील का, हे पडताळून पाहण्याची गरज असते, असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पॅरासिटामॉल हे सहज उपलब्ध असणारे, सुरक्षित आणि स्वस्त औषध आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ते खरेदी करता येते. हे केवळ तापाचे नव्हे, तर दाहशामक औषध आहे. मात्र, औषधांचा डोस जास्त काळ आणि जास्त प्रमाणात घेतल्यास मूत्रपिंडावर परिणाम होण्याची शक्यता असते. औषधांची जास्त मात्रा घेतल्याने पॉयझनिंग होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितले असेल त्याप्रमाणे औषधांचे सेवन करावे.

पॅरासिटामॉलचा डोस असावा किती?

पॅरासिटामॉलचा डोस व्यक्तीच्या वजनानुसार ठरतो. साधारणपणे ५० किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीला ५०० मिलिग्रॅम औषधांचा डोस दिवसातून ३ वेळा दिला जातो. याचाच अर्थ दिवसभरात केवळ १५०० ते २००० मिलिग्रॅमचा डोस पुरेसा असतो. हा डोस किती दिवस घ्यायचा हे डॉक्टर रुग्णाची परिस्थिती पाहून ठरवतात. औषध घेतल्यावर भरपूर पाणी पिण्याची गरज असते. अन्यथा औषध शरीरात साचून राहते. पॅरासिटामॉल उपाशीपोटी घेतल्यास जठरावर परिणाम होऊन अल्सरसारखे आजार होऊ शकतात

लहान मुलांना अचानक रात्री अपरात्री ताप आल्यास पॅरासिटामॉल दिले जाते. डॉक्टरकडे घेऊन जाईपर्यंत मुलांना एक डोस द्यावा. मात्र, ताप उतरत नाही म्हणून दर दोन-चार तासांनी औषध देत राहिल्यास मुलांना त्रास होऊ शकतो. कारण, एका डोसचा परिणाम सहा ते आठ तास राहतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.