पनवेल-कळंबोली विभागात मालगाडी रुळावरून घसरली…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मुंबईतील पनवेल-कळंबोली विभागात आज मालगाडी रुळावरून घसरली. अपघातामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून वसईकडे जाणारी मालगाडी अचानक रुळावरून घसरली. पनवेल-कळंबोली दरम्यान 4 वॅगन आणि ब्रेकव्हॅन रुळावरून घसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलहून दिवाकडे जाणाऱ्या अप मार्गावर हा अपघात झाला. तर डाऊन लाईन (दिवा ते पनवेल) सुरक्षित आहे. अपघातानंतर अनेक एक्सप्रेस गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. हळूहळू या मार्गावरून गाड्या हटवल्या जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.