रेल्वे सल्लागार समितीतर्फे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर यांना निवेदन…

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

येथील रेल्वे सल्लागार समितीने अमळनेर रेल्वे स्टेशन येथे पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर अशोक कुमार मिश्रा व नीरज वर्मा मुंबई सेंट्रल मॅनेजर यांना पाळधी रेल्वे स्टेशनला काही गाड्या थांबण्याबाबत निवेदन देवून सकारात्मक चर्चा केली. तसेच निवेदनात म्हटले आहे की, पाळधी स्टेशन परिसरात पस्तीस ते चाळीस खेडे लागून असून या गावातील जनता रेल्वे प्रवास मोठ्या प्रमाणात करतात अमरावती, शेगाव, मुंबई, सुरत, उधना येथील प्रवासी आहे. कारण कामानिमित्त पाळधी परिसरातील जनता मुंबई, सुरत रोजगारासाठी गेली आहेत. अनेक वर्षापासून सुरत पॅसेंजर व मेमो या दोन गाड्या व्यतिरिक्त कुठली रेल्वेला थांबा नाही. पाळधी रेल्वे स्टेशन येथून अनेक जलद गाड्या धावतात. परंतु कुठल्याही जलद गाडी पाळधी स्टेशन येथे थांबत नाही. जलद गाडीत बसण्यासाठी जळगाव येथून बसावे किंवा उतरावे लागते आणि जळगाव वरून पाळधी साठी रात्री रिक्षा किंवा बसची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. तरी यावर सकारात्मक विचार करून आमच्या पाळधी स्टेशन परिसरातील प्रवाश्यांना होणारा त्रास कमी करावा.

तसेच पाळधी येथील रेल्वेओव्हर ब्रिज बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेअसुन संबंधित विभागाने पुढील कारवाईसाठी पाठवले आहे. अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रतीक जैन धरणगाव रेल्वे सल्लागार समिती किशोर झवर यांना माहिती दिली.

निवेदनात भुसावल ते बांद्रा गाडी नंबर 19004 खांदेश एक्सप्रेस व अमरावती ते सुरत 2096 रेल्वे गाड्या येणारी व जाणारी यांना थांबा मिळावा, असे पाळधी व परिसराच्या वतीने रेल्वे सल्लागार समितीने रेल्वे प्रशासनास विनंती केली आहे. हे निवेदन देते वेळी प्रतीक जैन, संदेश झवर, महेंद्र चौधरी, योगेश पाटील, अधिकार पाटील, कैलास पाटील, मनोहर लंके आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.