कंगाल पाकिस्तानने सैन्याला शेतीला जुंपले !

0

इस्लामाबाद ;- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आपल्या लष्कराचा पाठिंबा मिळाला आहे. जवळपास तीन दशके देशावर राज्य केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने जनतेची भूक भागवण्याचा निर्धार केला आहे. पाकिस्तानी लष्करही आता संरक्षकाची भूमिका बजावणार आहे. पाकिस्तानी लष्कर देशावरील कर्ज कमी करण्यासाठी अन्नधान्य पिकवण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. पाकिस्तानच्या सरकारी जमिनीवर हे धान्य पिकवले जाणार आहे.

पाकिस्तान पुरता कंगाल झाला आहे. पीसीबीकडे क्रिकेटपटूंचे मानधन द्यायला पैसे नाहीत, तर पाकिस्तान सरकारकडे जनतेला पोटभर खायला घालायला अन्न नाहीय. अशातच दहशतवाद्यांनाही पोसायचेय आणि लष्करालाही.पंजाब प्रांतात 4 लाख हेक्टर जमीन घेतली: निक्की एशियाच्या बातमीनुसार, पाकिस्तानी लष्कराने सरकारी जमिनीचा मोठा भाग घेतला आहे, जिथे लोकांसाठी अन्नधान्य पिकवले जाईल. मात्र, कर्जाचा बोजा मोठा असल्याने हे सोपे होणार नाही. त्यासाठी लष्कराने जनतेच्या भागीदारीने शेती करण्याचे धोरण आखले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील ४ लाख हेक्टरपेक्षा जास्त सरकारी जमिनीवर लष्कर शेती करणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. म्हणजे दिल्लीपेक्षा तिप्पट मोठे क्षेत्र. धान्य पिकवल्याने पाण्याची बचत होईल आणि कमाईही होईल, असे ही योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे घटत्या परकीय चलनाच्या साठ्यात वाढ होण्यास आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती कमी होण्यास मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.