विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांची मोहाडी येथे क्षेत्रभेट

0

 

जळगाव ;- विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल जळगाव या विद्यालयाची इ.५वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ स्थानिक स्वराज्य संस्था’ येथे क्षेत्र भेट मोहाडी ग्रामपंचायत येथे आयोजीत करण्यात आली.

दि.25 सप्टेंबर या दिवशी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीअम स्कूल जळगाव या विद्यालयाची इ.५वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ स्थानिक स्वराज्य संस्था’ या विषयाअंतर्गत क्षेत्र भेट मोहाडी ग्रामपंचायत येथे आयोजीत करण्यात आली होती. या क्षेत्र भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना गावचे सरपंच धंनजय भिला सोनवणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवक दिलीप पवार यांचे मोलाचे मागदर्शन लाभले. तसेच ग्रामसेवक दिलीप पवार यांनी ग्रामपंचायत प्रशासन व कारभार याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.याचसोबत विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृती,एक गाव एक गणपती याची सविस्तर माहिती मिळाली तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अनुभवता आले.पाचवीच्या एकुण ११५ विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही यावेळी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर वाघ तसेच समन्वयक श्री संतोष चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. क्षेत्र भेट प्रमुख मोहित जावे यांनी यशस्वीरित्या क्षेत्र भेटीचे नियोजन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.