जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हा महसूल कर्मचारी संघटना बेमुदत संपात सहभागी

0

जळगाव ;- मार्च 2023 मध्ये सरकारी/निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांनी प्रलंबित मागण्यांसाठीजुनी पेन्शन योजना लागु करण्यासाठी बेमुदत संप आदोलन छेडले होते. या मागणीबाबत लेखी हमी देऊन इतर प्रलंबित मागण्यांबाबत सत्वर निर्णय घेतले जातील असेही निसंदिग्ध आश्वासन शासनाने संघटनेस दिले होते. त्यामुळे शासन स्तरावरील कार्यवाही पूर्ण होण्यास वेळ मिळावा या उ‌द्देशाने संघटनेने संप आदोलन स्थगित केले होते. तरी कोणत्याही मागणी संदर्भात अंतीम ठोस निर्णय अद्याप होऊ शकला नाही. तसेच संपाच्या आदल्यादिवशी दि. 13 डिसेंबर रोजी राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शासनाशी झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने राज्यातील 17 लक्ष शासकीय कर्मचारी-शिक्षकांचा दि 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप सुरु झालेला आहे.

 

तरी आज संपाच्या पहिल्या दिवशी जळगांव जिल्हयातील जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये महसूल सहायक(200) , अव्व्ल कारकून(192), मंडळ अधिकारी (110), तलाठी (423), शिपाई (133) व वाहन चालक (21) संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सदर संपास राजपत्रित अधिकारी महासंघ जळगांव व महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनीही समक्ष संपाच्या स्थळी भेट देऊन संपास एक दिवसांचे सामुहिक रजा आंदोलन करुन पाठिंबा दिलेला आहे. संपात खालील कर्मचारी ,अधिकारी उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी, सोपान कासार , उपजिल्हाधिकारी, गजेंद्र पाटोळे संजय गावकवाड उपजिल्हाधिकारी, श्रीमती. जयश्री माळी, श्रीमती. उषाराणी देवगुणे तहसिलदार, पंकज लोखंडे तहसिलदार, श्रीमती. शितल राजपूत तहसिलदार, . राहुल सोनवणे नायब तहसिलदार, प्रदीप झांबरे नायब तहसिलदार, . योगेश नन्नवरे, जिल्हा अध्यक्ष, . किरण बाविस्कर जिल्हा उपाध्यक्ष , घन:शाम सानप कोषाध्यक्ष, अतुल सानप , कार्याध्यक्ष दिपक चौधरी, सरचिटणीस , श्रीमती. रेखा चंदनकर सदस्य, श्रीमती. जागृती पवार, सदस्य, श्रीमती. वैशाली पाटील, श्रीमती. श्रीदेवी भोपे, श्रीमती. परवीन तडवी, श्रीमती. पल्लवी खडके, श्रीमती. प्राजक्ता वाघ, योगेश पाटील, के.एम पाटील, गणेश हटकर, हेमंत खैरनार, दिनेश उगले, विलास डोंगरे, शैलेश तरसोदे,. विलास हरणे, चंद्रकांत कुंभार, ए.पी. कुलकर्णी, किरण लोहार, सुनिल निंबाळकर, गजानन नरोटे, राहुल नवगिरे, नूर शेख, सुरेश महाले, कैलास महाले, . उध्दव नन्नवरे, संदीप पाटील, , आदीं सहभागी झाले आहेत.

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.