पहूर पोलिसांकडून ‘आरे’ ला ‘कारे ‘प्रत्युत्तर

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पहूर (pahur) बस स्थानक परिसरात शनिवारी साडेनऊ वाजेच्या सुमारास फत्तेपूर (Fatehpur) दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी अनिल सुरवाडे आणि रवींद्र मोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडाविरुद्ध पहुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन खडबडून जागे होत बस स्थानकावरील अतिक्रमण काढण्यात आल्याने बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे .तथापि पोलिसांवर हल्ला करणारे शेख फिरोज शेख सुपडू आणि ख्वाजा तडवी (रा.ख्वाजा नगर) पहुर पेठ. हे दोघे आरोपी मात्र अद्यापही फरारच आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पहूर पोलीस ठाण्याअंतर्गत फत्तेपूर दुरक्षेत्राचे कर्मचारी अनिल सुरवाडे आणि रवींद्र मोरे हे पहुर बस स्थानकावर असताना त्यांनी दोन युवकांना रस्त्यात गाडी लावू नका असे सांगितल्याचा राग येऊन त्यांनी चक्क पोलिसांवरच प्राण घातक हल्ला केला. यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्याला व हाताला जबर मार लागल्याने त्यांना प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .त्यानंतर जळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अनिल मोरे यांनाही गुंडांनी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पहुर पोलीस ठाण्यात शेख फिरोज शेख सुपडू आणि खाजा तडवी यांच्याविरुद्ध भादंवि ३५३,३३२,३३३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान पहूर पोलीस प्रशासनाने रविवारी सकाळी बस स्थानक परिसरातील हातगाड्यांचे अतिक्रमण काढल्याने एक प्रकारे कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आरे ‘ला ‘कारे’ चे प्रत्युत्तरच दिल्याचे बस स्थानकावर चर्चेचा विषय ठरला आहे. तथापि पोलीस प्रशासनावर झालेला हल्ला चुकीचा असून अशा भ्याड हल्ल्याचा सुज्ञ नागरिकांनी निषेध केला आहे. दरम्यान आरोपी फरार असल्याने त्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होत आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे व सहकारी करीत आहेत. त्याचप्रमाणे जखमी पोलिसांवर उपचार सुरु असून आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांना बसस्थानकातील अतिक्रमण काढण्यास यास आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.