पहूर येथे आयशरच्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

विद्यार्थिनीच्या अंत्यसंस्कार नंतर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पहूर येथे आयशरच्या धडकेत शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पावणे आठ वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक तथा पत्रकार शंकर भामरे हे सायकलने आपली मुलगी ज्ञानेश्वरी भामेरे हिस बस स्टॅन्ड वर घेऊन जात असताना मागून येणाऱ्या आयशर क्रमांक (एम. एच. २३ ऐ.यु ५५८२) या गाडीवरील चालक मद्यधुंद अवस्थेत असतांना जोरदार धडक दिली. त्यात शंकर भामरे व त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी (वय११) रस्त्यावर फेकले गेले. त्यात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला असून, शंकर भामरे हे जखमी झाले आहे. शवविच्छेदन करून दुपारी एक वाजता शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरी भामरे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आयशर चालक सुनिल ग्यानदेव सोनवणे राहणार अंजनवटी तालुका जिल्हा बीड यास पहूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको
सध्या सर्वत्र रस्त्याचे काम सुरू असून काम अपूर्ण अवस्थेत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळेच विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. जळगाव येथील वाघूर नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. रस्त्याची अवस्था अतिशय गंभीर असून येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा भयंकर त्रास होत आहे. या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघातही दररोज होत आहे. या रस्त्याचे काम त्वरित व्हावे यासाठी पहूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी व नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा, रामेश्वर पाटील, महेश पाटील, आदींनी संतप्त भावना व्यक्त करून रस्त्याचे काम त्वरित करावे दरम्यान रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तसेच आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.