धक्कादायक.. पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यात नगरदेवळा येथे जन्मदात्या बापाकडून गेल्या तीन वर्षांपासून अल्पवयीन मुलीचा सतत विनयभंग होत होता. या बाबतीत कुणास काही माहिती सांगितली तर मुलीचा जीवे ठार मारण्याची व आईला घराबाहेर हाकलून देण्याची धमकी नराधम बापाकडून मिळत असल्याने अखेर आईने तिचे कोपरगाव येथील भाऊ व आईला सदर प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून पत्नीने पती विरुध्द मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंग व पाक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचोरा पोलिसांनी तातडीने संशयीत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

नगरदेवळा ता. पाचोरा येथील मधूकर यादव शेलार याचे व त्याच्या पत्नीचे गेल्या अनेक वर्षापासून कौटुंबिक वाद असल्याने पत्नी कोपरगाव येथे माहेरी राहत होती. मधुकर याचे पासून महिलेस एक मुलगी झाली होती. दरम्यानच्या काळात ही मुलगी वडीलांकडे नगरदेवळा येथे राहत होती. मात्र आठ वर्षांपूर्वी पत्नी मधूकर शेलार याचे सोबत नगरदेवळा येथे नांदण्यासाठी आली आहे. मधूकर शेलार हा पत्नी घरी नसतांना १५ वर्षं ३ महिने वय असलेल्या पोटची मुलगी कपडे बदलवित असतांना तिला स्पर्श करणे, तिच्या अंगावरून हात फिरवीने असले प्रकार करीत होता. व तु याबाबत कुणाला काही सांगितले तर तुझ्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, तुझ्या आईला सांगितले तर तुला जीवे ठार मारेल, तुझ्या आईला घराबाहेर हाकलून देईल अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याने मुलीने हा प्रकार तीन महिने सहन केला.

दि. १३ सप्टेंबर रोजी पत्नी गावात काही कामासाठी गेलेली असतांना मधूकर शेलार याने पुन्हा तेच कृत्य केल्याने अखेर आई घरी आल्यानंतर पिडीत मुलीने घडलेली घटना आईला सांगितली. आईने कोपरगाव येथे राहत असलेल्या दोन भाऊ व आईस घटनेची माहिती दिली. आई आणि भावांनी पत्नीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दगल्याने अखेर पिडीत मुलीच्या आईने दि. १३ सप्टेंबर रोजी पत्नीविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.