पाचोऱ्यात पिस्टलसह चारचाकीतून जाणारे चौघे जेरबंद

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

शहरातील भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ एका चारचाकीतुन जात असलेल्या चौघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांचेकडून २५ हजार रुपये किंमतीची बंदुक व ज्या चारचाकी वाहनातुन जात होते ते वाहन हस्तगत करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यासोबतच पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील यांनी दाखविलेल्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. २३ जुन रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काहीजण एका चारचाकीतुन अग्निशस्त्र घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील यांनी मिळाली. दरम्यान योगेश पाटील यांनी सदरची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश चौबे, ए. एस. आय. सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील, प्रविण परदेशी, समिर पाटील (चालक) या पथकाने मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास भडगाव रोडवरील समर्थ व्हॅलीजवळ सापळा रचला.

दरम्यान याठिकाणहुन एम. एच. १९ ए. एक्स. ९८१९ या क्रमांकाची टाटा कंपनीची इंडिका व्हिस्टा ही कार जात असतांना पथकाने त्यांना थांबवत चौकशी केली असता पोलिसांना एक स्टीलचे राखाडी रंगाचे त्यावर काळ्या रंगाचे हॅण्डग्रीप असलेले विना परवाना पिस्टल व मॅझीन आढळुन आले. पोलिस पथकाने भैय्या निकुंभे (वय २५), रोहीत साहेबराव झोगडे (वय २२, रा. नाशिक), नितीन बाबुलाल नासरे (वय २७, रा. अकोला) व सचिन पाटील (वय ३१, रा. पाचोरा) या चौघांना २५ हजार रुपये किंमतीची विना परवाना पिस्टल व २ लाख ५० हजार रुपये किंमतीची इंडिका व्हिस्टा चारचाकी सह ताब्यात घेत त्यांचे विरूद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे. पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील यांच्या सतर्कतेने पुढील होणारा अनर्थ टळला असुन योगेश पाटील सह पोलिस पथकाने दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.