राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली असली तरी काही जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. दरम्यान आता राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

मुंबईसह  कोकण भागात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात आगामी पाच दिवसात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर उर्वरीत राज्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आला आहे. कोकणात ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर ठाणे, पालघर, मुंबई, रायगड या जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यासह मध्य महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, मराठवाडामधील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पाऊस होईल. तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोलीत पावसाचा अंदाज आहे. तर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नगर येथेही चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.