पाचोऱ्यात बंद घर फोडले ; अडीच लाखांचा ऐवज लंपास

0

पाचोरा ;- एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना शहरातील मोंढाळे रस्त्यावरील सिंधी कॉलनी भागात उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शहरातील मोंढाळे रस्त्यावरील सिंधी कॉलनी भागात मनिष उधवदास वाधवानी हे आपल्या परिवारासह राहत असून दि. ४ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता मनिष हे आपल्या कुटुंबासह धुळे येथील मावशीकडे गेले होते. दरम्यान ५ जुन रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास मनिष यांना शेजार्‍याचा फोन आला की, तुमच्या घराचा दरवाजा उघडला आहे. ही माहिती मिळताच मनिष यांनी पाचोरा गाठले. घरात प्रवेश पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बांगड्या ७० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, ४० हजार रुपये किंमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, १२ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ८ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातील टाप्स व ७० हजार रुपये रोख (५००, २००, १०० रुपयांच्या नोटा) असा २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समजले.

दरम्यान, मनिष वाधवानी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे पुढील तपास हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.