शाहिरी पोवाड्यातून शासनाच्या सर्वसामान्य योजनांच्या प्रचार प्रसाराला पाचोर्‍यातून प्रारंभ

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मुंबई तसेच जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या जिल्हा वार्षिक व सर्व सामान्य योजनांचा प्रचार प्रसाराला पाचोरा येथून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल तसेच नवनियुक्त तहसिलदार प्रवीण चव्हाणके यांनी शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व या कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखवुन कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

खान्देश लोकरंग फाउंडेशन नगरदेवळा ता. पाचोरा या संस्थेच्या वतीने पाचोरा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर व खान्देश लोकरंग फाउंडेशन चे अध्यक्ष समाजभूषण शिवाजीराव पाटील आणि सहकारी यांनी आपल्या शाहिरी पोवाडा द्वारे, त्रूणधान्य तसेच ज्येष्ठ नागरिक सवलतजिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना यामध्ये महाराष्ट्र राज्यगीत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत एस.टी. प्रवास, नियमित कर्जफेड करणारे शेतकरी प्रोत्साहन रक्कम, प्रधानमंत्री पिक विमा योजना, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग, पौष्टिक तृणधान्य वर्ष, जलयुक्त शिवार अभियान, चला जाणूया नदीला, जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल, अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार नोक-या, मेडिकल हब, जनावरांवरील लम्पी आजार, सरपंचाची थेट मतदारांमधून निवड, ई – पीक पाहणी, पाण्याचा काटकसरीने वापर, इंडस्ट्रीयल पार्क, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आदि योजनांची प्रचार शाहीर शिवाजीराव पाटील व सहकारी आपल्या लोकगीत पोवाडे गोंधळ गीत तसेच पथनाट्याद्वारे प्रभावीपणे सादर केले. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा व शहरवासीयांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.