अंतुर्ली येथील इसमाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या, सुपारी देऊन खून केल्याचा संशय…

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली नं.३ येथील ३९ वर्ष वयाच्या इसम बुलेट वर बसलेला असतांना मागून बुलेरो या वाहनाने धडक देवून मोटारसायकल सह १५ ते २० फुट फरफटत नेत गाडीहून खाली पडल्यानंतर मानेवर, छातीवर व बरगड्यावर चॉपर सारख्या धारधार शस्त्राने सपासप वार करुन अज्ञात मारेकरी पसार झाले. ही घटना रविवारी सकाळी ७.३० ते ८.०० वाजेच्या दरम्यान एरंडोल तालुक्यातील उत्राण शिवारातील दरग्याजवळ घडली. हा दर्गा कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. खून झालेल्या इसमाने गेल्या आठवड्यात गिरड येथील एका इसमास बेदम मारहाण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन तीन दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जळगाव येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

अंतुर्ली नं. ३ येथील सचिन (सोनु) देविदास पाटील (वय – ३९) हा दि.१९ मार्च रोजी सकाळी सात वाजता घरातून कुणास काहीएक न सांगता आपल्या बुलेट गाडीवरुन गिरणा नदीपात्रातील भातखंडे ते उत्राणकडे जाण्यासाठी निघाला होता. दर्ग्याजवळ आल्यानंतर मोटारसायकल वर बसून पुर्वेकडे तोंड करून उभा असलेला सचिन पाटील यांच्या मागवून भरधाव वेगाने मागवून आलेल्या बुलेरो गाडीने बुलेटसह त्यास जोरदार ठोस देवून १५ ते २० फुट फरफटत नेले व सचिन हा बुलेटहून खाली कोसळल्यानंतर बुलेरो वाहनातून उतरुन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या छातीवर, मानेवर व बरगड्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन सचिन ह्यास जमिनीवर पडल्यानंतर बुलेरो घेऊन पसार झाले. काही वेळाने सचिनच्या चुलत भावास घटनास्थळाहून फोन आल्यानंतर तो घटनास्थळी पोहचला असता त्यास सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मात्र एकास त्याच्या हाताची नस सुरू असल्याने तो जीवंत असल्याचे सांगत पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात आणले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.