शिवसेना व धनुष्यबाण गोठविल्याने निवडणूक आयोगाचा जाहीर निषेध

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

दि. ९ आॅक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने घाईघाईने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसेना व धनुष्यबाण गोठविल्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने आवश्यक माहिती आयोगाकडे पाठविली होती. व संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती देखील ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाने दबावाखाली येऊन घाईघाईने निर्णय घेत खऱ्या शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्य बाण चिन्ह गोठविले. या निर्णयाच्या निषेधार्थ शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दि. १० आॅक्टोबर रोजी पाचोरा शहरातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयापासुन छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालया पर्यंत निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी “५० खोके एकदम ओके”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, “कमळाबाईचा निषेध असो”, “शिवसेना व धनुष्यबाण महाराष्ट्राची शान”, “गद्दारांचा धिक्कार असो”, “मिंधे व शिंदे गटाचा धिक्कार असो” अशी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.

मोर्चात वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, तालुका अध्यक्ष जिभाऊ पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, मा. जि. प. सदस्य उद्धव मराठे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पाटील, शंकर मारवाडी (भडगाव), शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, अॅड. दिपक पाटील, जे. के. पाटील, उपजिल्हा युवाधिकारी संदिप जैन, माधव जगताप (भडगाव), रविंद्र पाटील (भडगाव), मा. नगरसेवक दत्तात्रय जडे, धर्मेंद्र चौधरी, पप्पू राजपूत, अतुल चौधरी, विनोद पाटील, पप्पु जाधव, राजेंद्र राणा, अधिकार पाटील, धनराज पाटील, अजय पाटील, भरत खंडेलवाल, हरीष देवरे, विवेक बच्छाव, विजय पाटील, शरद पाटील, नाना वाघ सह मोठ्या संख्येने शिवसेना, युवासेना व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चानंतर निवडणूक आयोगाचा जाहीर निषेधार्थ उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना उपस्थितांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.