प्रियकरासह बापाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघास अटक

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भुसावळ (Bhusawal) तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तीला परत आणून बालकल्याण समितीकडे ठेवण्यात आल्यानंतर तिने जाबाबात धक्कादायक माहिती दिली. दरम्यान बापाने व प्रियकराने अत्याचार केल्याची घटना पोलीस तपासात उघडकीस आले असून त्या दोघांना पोलिसांनी अटक केले आहे.

याबाबत वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे फेसबुकवर एका सोबत प्रेमाचं सुत जुळल्याने ती व तीचा प्रियकर दि. २९ सप्टेबर गुरुवार रोजी घरातून पळून गेले होते. ही गोष्ट मात्र बापला माहित नसल्याने वरणगाव पोलीस स्टेशनला मूलगी सकाळी दहा वाजेला सायकलीने कॉलेजला जाते म्हणून सांगून गेली होती, संध्यकाळ सहा वाजेपर्यत मूलगी घरी आली नाही म्हणून नातेवाईकांसह शोध घेत असताना तीची सायकल गवतात पडलेली दिसली. मात्र मूलीचा शोध लागलाच नसल्याने बापाने मूलीच्या हरविलेल्या बाबत तक्रार दिल्यानंतर पोलीस निरिक्षक आशिष अडसुड यांच्या मार्गदर्शनाखाली मुलीचा शोध घेत फौजदार नरसिंग चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुजरातमधील सोरठी सोमनाथ येथून घेऊन आले होते. दरम्यान त्या मूलीला बाल कल्याण समितीकडे पाठविण्यात आले होते.

तेथे पिडीत मूलीने आपल्या जबाबात प्रियकराने व आपल्या बापाने अत्याचार केल्याचे सांगितल्याने वरणगाव पोलीसांनी प्रियकर व मूलीच्या बापाला अटक करण्यात आली. पोलीस स्टेशनला याबाबत त्या दोघांविरोधात भादवी कलम ३७६ प्रमाणे पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सह उप पो. निरिक्षक परशुराम दळवी हे करीत आहे. त्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.