पाचोऱ्यात २१ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

शहरातील पुनगाव रोडवर राहत्या घरात एका २१ वर्षीय तरुणाने घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आल्याने, एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील पुनगाव रोडवरील एका काॅलनीतील रहिवाशी माजी सैनिक रोहिदास पाटील यांचा एकुलता एक मुलगा सौरभ रोहिदास पाटील (वय – २१) याने राहत्या घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना २५ आॅगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. घराच्या वरच्या खोलीत सौरभ याने टोकाचे पाऊल उचलले.

Leave A Reply

Your email address will not be published.