साडेपाच लाखांची बनावट दारू जप्त, दोन जण ताब्यात

दारुबंदी विभागाची मोठी कारवाई

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर बनावट देशी दारूची वाहतूक करत असलेल्या इसमांवर राज्य उत्पादन शुल्कच्या जळगाव जिल्ह्याच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानुसार संशयित तीन आरोपींवर अटकेची कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी १९ रोजी दुपारी पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड वरखेड रस्त्यावर त्यांनी सापळा रचला असता, तिथे बनावट देशी दारू वाहतूक करताना संशयित आरोपी अविनाश संतोष जाधव (वय – २४ वर्ष) रा. हिंगणे ता. जामनेर) आणि रेहान रमजान मन्यार (वय – २० वर्ष) रा. नेरी दिगर ता. जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून बनावट देशी दारू टँगो पंचच्या १८० मि.ली. असलेल्या एकूण ९८४ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ‌

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बऱ्याच दिवसापासून अवैध बनावट मद्याची सदर परिसरात वाहतूक होत असल्याची माहिती दारूबंदी विभागाचे अधिकारी पाटील यांना होती. यामध्ये योग्य वेळी सापळा रचून भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. सदर बनावट मद्य पुरविणारा महेन्द्र शामलाल राजपूत रा. तळेगाव ता. जामनेर यास देखील संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्यातील वापरलेली चार चाकी वाहन (एम. एच. २७ बी. झेड. ५७०६) ही देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण ५ लाख ५१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. तिघही‌ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एच. पाटील, दुय्यम निरीक्षक वाय. वाय. सूर्यवंशी, गोकुळ कंखरे, रघुनाथ सोनवणे, प्रतिकेश भामरे, मनोज मोहिते, विठ्ठल हटकर यांनी केली आहे. कारवाईसाठी चाळीसगावचे आर.जे. पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकेश पाटील, गिरीश पाटील यांनी मदत केली. घटनेचा पुढील तपास वाय. वाय. सूर्यवंशी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.