प्रभासचा अगामी चित्रपट पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, वाचा सविस्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बाहुबली पासून चाहत्यांच्या प्रभासकडून (Prabhas) अपेक्षा या वाढल्या असून, काही दिसांपूर्वीच आदिपुरुष ह्या चित्रपट आपल्याला प्रभास दिसला. प्रभू श्रीरामांची भूमिका त्याने साकारली खरी पण, प्रेक्षकांना ती जास्त काही आवडली नाही. त्यामुळे प्रभासला भरपूर प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभास हिट चित्रपटाच्या शोधात आहे. त्याच्या सालार, राधेश्याम, या चित्रपटाने देखील प्रेक्षकांना पाहिजे तसे खुश केले नाही. त्याचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के'(Project K) यामध्ये काहीतरी नवीन बघण्यास मिळेल असे वाटले होते पण, सोशल मीडियावर त्याच्या लुक व्हायरल होताच चित्रपट निशाण्यावर आला आहे.

अनेकांनी त्याच्या त्या लूकची तुटला हॉलिवूड आयर्न मॅनसोबत करण्यास सुरुवात केली आहे. प्रोजेक्ट के हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असणारा चित्रपट आहे. त्यात प्रसिद्ध अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सुद्धा प्रभससोबत झळकणार आहे. सोशल मीडियावर ‘प्रोजेक्ट के’ ‘चा ट्रेंड जोरदार सुरु आहे. अशातच नेटकऱ्यांनी प्रभासच्या नव्या लूकवर टीका केली आहे. प्रोजेक्ट के चे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले असून ट्रोलर्सनं त्यांच्या या चित्रपटावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.