पाचोऱ्यात विश्वहिंदु परिषद बजरंग दलातर्फे “पठाण” चित्रपटाचा निषेध

0

लोकशाही न्युज नेटवर्क

आजच रिलिज झालेल्या “पठाण” चित्रपटात अश्लील दृश्य दाखविण्यात आलेले असल्याने याचा निषेध नोंदवत आज २५ जानेवारी रोजी पाचोरा शहरातील विश्वहिंदु परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील प्रकाश टाॅकीज् मध्ये पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडुन तसेच जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. याप्रसंगी विश्वहिंदु परिषद बजरंग दलाचे सचिन येवले, अभिषेक पाटील, अभिषेक नाथ, गौरव राजपुत, बंटी भोई, चेतन भोई, गोलु महाजन, प्रशांत सोनार, गोपाल सोनार, सागर भोई, पप्पु पाटील यांचेसह प्रकाश टाॅकीज् चे संचालक मनिब काबरा उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.