वृद्ध माता-पित्याना मुलाकडून खावटीचा आदेश

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा – पारोळा येथील रहिवासी पंडीत रघुनाथ माळी व त्यांची पत्नी विमलबाई पंडीत माळी यांना विक्रम पंडीत माळी हा एकुलता एक मुलगा असुन तो त्याचे पत्नी व मुलाबाळांसह गावातच विभक्त राहतो. आई वडिल वृद्ध झाल्याने वृद्धपकाळाने त्यांच्याने कोणताही कामधंदा होत नसल्याने त्यांच्या मुलाने आई वडिलांची पालन पोषणाची जबाबदारी पार पाडलेली नव्हती. म्हणुन वृद्ध आई वडिलांनी पारोळा येथील मे. न्यायदंडाधिकारी साो. प्रथम श्रेणी यांचे न्यायालयात मुलाकडुन खावटी मिळण्याकरीता प्रकरण दाखल केलेले होते.
सदर प्रकरणात गुणवत्तेवर सुनावणी होवुन पारोळा न्यायालयातील न्यायमुर्ती मा. एम. एस. काझी, साहेब यांनी दि. १८/०१/२०२२ रोजी न्यायनिर्णय पारीत करुन मुलाने आई वडिलांना दरमहा ५ हजार रुपये खावटी देण्याचे आदेश पारीत केलेले आहेत. न्यायालयाचे आदेशामुळे वृद्ध आई वडिलांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे. सदर कामी वृद्ध आई वडिलांतर्फे विधीतज्ञ अकील वाय. पिंजारी, पारोळा यांनी कामकाज पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.