जळगाव सिव्हील हॉस्पिटलची OPD रविवारी सुरु राहणार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दिवाळी निमित्ताने २४ तारखेला लक्ष्मीपूजन व २६ ला भाऊबीज निमित्ताने सुट्टी असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथील ओपीडी रविवारी दि. २३ ऑक्टोबर रोजी सुरू ठेवण्यात येणार आहे. रुग्णासह त्यांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी, वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातर्फे सदर बाब प्रसिध्द करून, नागरिकांनी दंत, नेत्र, कान-नाक-घसा, सर्दी-ताप, खोकला विविध जखमा, असह्य पोटदुखी, हाडांचे आजार, त्वचारोग, लहान मुलांचे आजार, स्त्रीरोग आदी तपासणी करण्यासाठी रविवारी आणि मंगळवारी रुग्णालयात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.