Saturday, January 28, 2023

T20 विश्वचषक; न्यूझीलंडकडून गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव…

- Advertisement -

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) च्या सुपर 12 फेरीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव केला. (New Zealand defeated defending champion Australia by 89 runs) विजयासाठी 201 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि डेव्हिड वॉर्नर (5) स्वस्तात बाद झाला. आणि वॉर्नर आऊट झाल्यावर ठराविक अंतराने विकेट पडू लागल्या. प्रत्येक विकेट पडताना आवश्यक धावांच्या सरासरीचा दबाव वाढत गेला.

- Advertisement -

मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल (28) आणि खालच्या फळीतील पॅट कमिन्स (21) यांनी धावा केल्या, पण धावांचे ओझे इतके होते की कांगारू फलंदाजांची हवाच सुटली. आणि संपूर्ण संघ 17.1 षटकात केवळ 111 धावा करू शकला. सौदी आणि सॅन्टनरने प्रत्येकी तीन तर बोल्टने दोन गडी बाद केले. त्याचवेळी फर्ग्युसन आणि सोधीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 200 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. न्यूझीलंडकडून डेव्हॉन कॉनवेने 58 चेंडूत शानदार 98 धावा केल्या. तत्पूर्वी, संघाचा सलामीवीर फिन ऍलनने फलंदाजी करताना 16 चेंडूत 42 धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने 2 आणि झाम्पाने एक विकेट घेतली.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे