चितोडे वाणी समाज मराठी राष्ट्रीय कार्यकारणी तर्फे ऑनलाईन पाडवा पहाटचे आयोजन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

चितोडे वाणी समाज मराठी राष्ट्रीय कार्यकारणी तर्फे  दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

चितोडे वाणी समाजातील सर्व स्तरांमधील म्हणजेच ४ वर्षाच्या बालकांपासून ७५ वर्षापर्यंत च्या सर्वांनीच  पाडवा पहाट कार्यक्रमात सहभाग घेतला आहे.

यामध्ये नृत्य, संगीत, कथक, तबला, पियानो वादन, एकपात्री प्रयोग या सारख्या विविध कलागुण पाडवा पहाट द्वारा सादर होणार आहे.

चितोडे वाणी समाजातील प्रत्येकाने पहिलाच पाहिजे असा विलोभनीय आणि चैतन्यदायी कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्ष अविनाश खारुळ यांनी दिली.

जळगाव येथील प्रा. डॉ. शरद अकोले तर मुंबई येथील डॉ. मनोहर अकोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

चिवास मराठी आयोजित पाडवा पहाट कार्यक्रम झूम, यू ट्यूब आणि फेसबुक द्वारे पाहता येणार आहे.

तरी चितोडे वाणी समाजातील सर्वांनी २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता उपस्थित राहून कलावंतांना प्रोत्साहन द्यावे, त्यांचे कौतुक करावे असे आवाहन चिवास मराठी संस्थेचे अध्यक्ष अविनाश खारुळ, कार्याध्यक्ष राजेश यावलकर, उपाध्यक्ष प्रा.डॉ. उमेश वाणी, सौ. मनीषा गजऋषी, सचिव- धिरज पाटील, सहसचिव- परेश सांगवीकर, कोषाध्यक्ष- अनंत गडे, सहकोषाध्यक्षय- नितीन अट्रावलकर, जनसंपर्क अधिकारी – राजेंद्र यावलकर, युवा प्रतिनिधी-भूषण खरे, संस्थेचे कार्यकारी सदस्य आणि समन्वयक यांनी केले आहे.

झूम लिंक~

https://us06web.zoom.us/j/84482487939?pwd=UUZuaENkRFNGaWlScjIvL2orYnZ3Zz09

Meeting ID: 844 8248 7939

Passcode: chiwas

Leave A Reply

Your email address will not be published.