तरुणाची २९ हजारात ऑनलाईन फसवणूक; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. जळगाव शहरातील तरुणाच्या फ्लिपकार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी करुन त्याची ऑनलाईन २९ हजार ७९७ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

तेजेश्वरराव गोकूळ पाटील (वय ३२, रा. त्र्यंबक नगर, विश्वजीत अपार्टंमेंट) येथे वास्तव्यास आहेत. तेजेश्वरराव यांच्या फ्लिपकार्टच्या वॉलेटवरुन परस्पर खरेदी केली. अशाप्रकारे तब्बल २९ हजार ७९७ रुपयांत संबंधितांनी ऑनलाईन खरेदी करुन फसवणूक केली.

२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संबंधितांनी ही खरेदी केली होती असे समोर आले. दरम्यान फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर तेजेश्वरराव यांनी रामानंदनगर पोलिसात तक्रारी दिली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.