जिल्ह्यात पोषण पंधरवडा अभियानास प्रारंभ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यात पोषण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. सदर पोषण पंधरवडाचे उद्घाटन 21 मार्च रोजी उपायुक्त गोसावी साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साईबाबा मंदिर मेहरूण येथे करण्यात आले.

या कार्यक्रमाला शहरातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस व मुख्य सेविका उपस्थित होत्या. पुढील पंधरा दिवसात शासनाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार कुपोषित मुलांची शोधमोहीम करणे, त्यासाठी वजन उंची घेणे, माता बैठकी घेणे, गरोदर माता, स्तनदा माता यांच्या समक्ष ग्रुप भेट करणे, त्यांना आहाराचे महत्व व आरोग्याचे महत्त्व इत्यादी विषयी मार्गदर्शन करणे, किशोरवयीन मुलींना रक्ताच्या कमतरतेविषयी जनजागृती करणे, त्यांचे एचबी चेकअप करणे, स्वच्छतेचे महत्व पटवून सांगणे, आहाराच्या विविध पाककृती याविषयी माहिती देणे. जल साक्षरतेचे महत्व लाभार्थ्यांना पटवून सांगणे, लसीकरण आरोग्य तपासणी करून घेणे, इत्यादी कार्यक्रम पुढील पंधरा दिवसात घेण्यात येणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.