विद्यापीठात ध्यानासाठी युवा एकता कार्यक्रम

0

जळगाव ;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभाग आणि हार्ट फुलनेस एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती दिनी ऑफ लाईन व ऑन लाईन पध्दतीने ध्यानासाठी युवा एकता हा कार्यक्रम घेण्यात आला.

दि. १२ जानेवारी रोजी हार्ट फुलनेस मेडीटेशनचे कमलेश पटेल यांनी ध्यान धारणेचे महत्व विषद केले. यावेळी संचालक डॉ. मनीषा इंदाणी योगशास्त्र विभागप्रमुख इंजि. राजेश पाटील, हार्ट फुलनेस मेडीटेशनच्या समन्वयक निलम अग्रवाल, प्रभावती महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. लिना चौधरी, प्रा. गितांजली भंगाळे, माधुरी तायडे, तुषार सोनवणे, रत्नाकर सोनार, हिम्मत जाधव, यशवंत गरूड, सुरेश बागुल आणि सुनील चव्हाण यांनी सहकार्य केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.