एम.ए. राज्यशास्त्र विषयासाठी कै. अण्णासाहेब तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक

0

जळगाव ;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम. ए. राज्यशास्त्र विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस कै. अण्णासाहेब तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक सुरु करण्यासाठी शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय पाटील व प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी विद्यापीठाकडे धनादेश सुपूर्द केला.

प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांच्याकडे डॉ. संजय पाटील यांनी हा धनादेश दिला. एम.ए. राज्यशास्त्र या विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला कै. अण्णासाहेब तुकाराम विठ्ठल पाटील यांच्या स्मरणार्थ सुवर्ण पदक दिले जाणार आहे. याप्रसंगी कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्रा.शशिकांत बोरसे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.