विद्यापीठात “सायबर सुरक्षा” या विषयावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे व्याख्यान

0

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेतर्फे “सायबर सुरक्षा” या विषयावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे व्याख्यान झाले.

यावेळी बोलतांना डॉ. वडनेरे म्हणाले की, सोशल मीडिया दुधारी तलवारी सारखी असून त्याचा योग्य वापर केल्यास यासारखे संदेशवहनाचे परिणामकारक दूसरे चांगले माध्यम नाही. सोशल मीडियामुळे मिळणा­ऱ्‍या ज्ञानाचा फायदा आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी निश्चित होतो. मात्र थोडासा निष्काळजीपणा आयुष्यास वेगळे वळण लावतो. अनोळखी व्यक्तिकडून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारु नका. आपले अत्यंत पर्सनल फोटो शेअर करु नका. शक्यतो ग्रुप फोटो शेअर करा. विविध प्रसंगाचे फोटो शेअर करतांना सामाजिक भान ठेवा. त्यामुळे तुमचे लोकेशन डिटेक्ट होऊ शकते. फेसबुक पासवर्ड आणि ईमेल पासवर्ड वेगवेगळा ठेवा.

या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिकशास्त्रे प्रशाळेचे संचालक प्रा. अजय पाटील यांच्या मार्गदशनाखाली डॉ. समाधान कुंभार यांनी केले होते. सुत्रसंचलन डॉ. समाधान बनसोडे तर आभार डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.