निंभोरा येथील जलकुंभ धोकादायक स्थितीत, अधिकाऱ्यांनी केली पाहणी

0

निंभोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

निंभोरा बु:ता: रावेर येथील गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक स्थितीत असून, सध्या याच जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सन २०१४/१५ या वर्षी ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती योजनेतून सुमारे दोन लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ निंभोरा येथे दसनूर रोड लगत भुसावळ येथील उमेश इंटरप्राईजेस या संबंधित ठेकेदारा कडून अंदाजीत २२ लक्ष रुपये एवढा खर्च करून बांधण्यात आला होता. २०१७ ला ग्रामपंचायतीला हस्तांतरित करुन पाणी पुरवठा सुरू करण्यात आला मात्र, जल कुंभाच्या एकूण पाच कॉलम पैकी आतील प्रमुख सेंटरचा कॉलम मधील सळई (आसारी) बाहेर निघून मोठा आवाज झाला. धोकादायक परीस्थिती पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या लक्षात येताच व गावकऱ्यांना समजताच एकच खळबळ उडाली.

गावातील रहिवाशांनी जलकुंभाकडे धाव घेतली व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची ओरड केली. संबंधित ठेकेदाराने व तत्कालीन ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणाचा हा परिणाम आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने कुणी काही केलं असेल का? अशी चर्चाही चर्चिली जात होती. जलकुंभाच तातडीने उपाय योजना करून दुरुस्ती करावी. इतक्या काळात जलकुंभ निखळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात दि.५ रोजी ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलवून संबंधित ठेकेदार व ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले. नवीन जलजीवन मिशन योजनेअंतर्गत येत्या दोन दिवसात जलकुंभाचे काम सुरू करण्यात येईल असे सरपंच सचिन महाले यांनी सांगितले.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे यावल येथील उपअभियंता संतोष सुरवाडे व संबंधित ठेकेदार उमेश इंटरप्राईजेस चे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ शिष्टमंडळाने जलकुंभाची पाहणी केली व या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. यावेळी ठेकेदार उमेश चौधरी यांनी मी माझ्या स्वखर्चाने दुरुस्ती करून देईल असे मान्य केले.

याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी गणेश पाटील सरपंच सचिन महाले, विवेक ठाकरे दुर्गादास पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता राणे, मंदाकिनी बराटे, मनोहर तायडे, दिलशाद शेख, ललित कोळंबे, युनूस खान, अकील खाटीक, ग्रामस्थ नितीन पाटील, प्रमोद कोंडे, राजीव बोरसे, दिलीप सोनवणे, रवी महाले राजेंद्र महाले, राहुल सोनार, कैलास चौधरी ठेकेदार उमेश चौधरी व पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुरवाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.