नीरज चोप्राने इतिहास रचला..!

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन (Tokyo Olympic Champion) असलेल्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) रौप्य पदक जिंकले आहे. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८८.१३ मीटर भाला फेकला या भाल्याने त्याला रौप्य पदक मिळवून दिले आहे. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनाडा अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर भालाफेक करून जिंकला आहे.

नीरज चोप्राने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन नीरजने जागतिक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेचे सुवर्णपदक ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सने पटकावले.

ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.४६ मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले तर झेक प्रजासत्ताकच्या याकुब वालदेशने कांस्यपदक मिळवले. भारताचा रोहित यादवने ७८. ७२ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह १० वे स्थान मिळविले.

नीरजने  या स्पर्धेत पदक जिंकून एक विक्रम केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. त्याच्या आधी अनुभवी अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये या स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.