Monday, January 30, 2023

जळगावात भाजपच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार (ajitdada pawar) यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून भाजपतर्फे अजितदादांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पण जेव्हा भाजपच्या नेत्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह देशातील महापुरुष , राष्ट्रपुरुष यांच्याविषयी वेळोवेळी बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य महापुरुषांचा अवमान (mahapurushancha avman) केला त्यावेळेस भाजपचे नेते कोणत्या बिळात जाऊन लपलेले होते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीचे (bjp) नेते सातत्याने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून गैरसमज पसरवत खोटा व चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करून इतिहासाचे विकृतीकरण करीत आहेत . या सर्व बाबींच्या निषेधार्थ व अजित दादा पवार यांच्या समर्थनार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा व जळगाव महानगर यांच्या वतीने शास्त्री टॉवर चौक येथे भाजपच्या विरोधात व अजित पवार समर्थनार्थ घोषणा देत निदर्शने आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील , महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , नामदेव चौधरी , प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील , संजय पवार , वाल्मीकमामा पाटील ,लीलाधर तायडे , अमोल कोल्हे , पुरुषोत्तम चौधरी , ईश्वर राहणे , अभिलाषा रोकडे , इब्राहीम तडवी , अरविंद मानकरी , मझहर पठाण , रमेशजी बारे , संजय चव्हाण , किरण राजपूत , डॉ रिजवान खाटीक , रहीम तडवी , अशोक सोनवणे , विशाल देशमुख, जितेंद्र चांगरे , रफीक पटेल , योगेश साळी , जयश्री पाटील , सौ वर्षा राजपूत , कलाबाई शिरसाठ , यशवंत पाटील , राहुल टोके , खुशाल चव्हाण , कुंदन नारखेडे , खलिल शेख , मो जुबेर कांजरी , नामदेव पाटील , आदि कार्यकर्ते उपस्थित होते .

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे