डॉक्टरच्या मानेवर धारदार शस्त्राने 18 वार, घटना सीसीटीव्हीत कैद…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

नाशिकमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपीने डॉक्टरांच्या मानेवर धारदार शस्त्राने 18 वार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ही घटना नाशिकमध्ये घडली. एका व्यक्तीने रुग्णालयातील डॉक्टरच्या मानेवर धारदार चाकूने 18 वार केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. हत्येसाठी हा हल्ला करण्यात आला. डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता नाशिक पंचवटीतील सुयोग नावाच्या खासगी रुग्णालयात घडली. डॉ.कैलास राठी असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी राजेंद्र मोरे याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.कैलास राठी आणि आरोपी राजेंद्र मोरे यांच्यात जमिनीच्या व्यवहारातील काही रकमेवरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता. घटनेच्या रात्री आरोपी राजेंद्र मोरे हा रूग्णालयातील डॉक्टर कैलास यांच्या केबिनमध्ये पैसे मागण्यासाठी गेला आणि संधी मिळताच त्याने डॉक्टरांच्या मानेवर कोयत्याने वार करून तेथून पळ काढला. सध्या गंभीर जखमी डॉ.कैलास राठी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी राजेंद्र मोरे याच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.