नाशिकमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, ३ जण जखमी

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या मनमाड-मालेगाव राज्यमहामार्गावर चौंढी घाटात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला असून, ३ जण जखमी झाले आहे. अपघातानंतर कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मनमाड-मालेगाव राज्य महामार्गावरील चौंढी घाटात रविवारी (२६,नोव्हेंबर) कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. कारमधील चारही तरुण हे शिर्डीकडे जात होते. कंटेनर पलटी होऊन कारवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून, यामध्ये कारमधील चारही तरुण हे शिर्डीकडे जात होते. कंटेनर पलटी होऊन कारवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून यामध्ये कारमधील एकाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झालेत.

अपघातानंतर कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला काढून वाहतुक सुरळीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.