Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»आणखी पाच वर्षे मोफत रेशन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
    ताज्या बातम्या

    आणखी पाच वर्षे मोफत रेशन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 5, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ८० कोटी लोकांना मिळणार लाभ

    नवी दिल्ली: कोरोनामहामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत रेशन धान्याची योजना अजून पाच वर्षे म्हणजे २०२८ सालापर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील प्रचारसभांमध्ये केली. ८० कोटी गरीब लोकांसाठी ही दिवाळी भेट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.

    विधानसभा निवडणुकांसाठी शनिवारी मोदींनी छत्तीसगडच्या दुर्ग आणि मध्य प्रदेशातील रतलाम येथे प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांमध्ये मोदींनी पीएम गरीब कल्याण अन्न योजना डिसेंबरनंतर अजून पाच वर्षे सुरू राहणार असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशन दुकानांवर महिन्याला पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतो. कोरोना महामारीच्या काळात ३० जून २०२० रोजी सरकारने ही योजना सुरू केली होती. देशातील ८० कोटी लोक
    या योजनेचे लाभार्थी असल्याचे सांगितले जाते. छत्तीसगडमधील सभेत मोदींनी सत्ताधारी काँग्रेसवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गत पाच वर्षांत २ हजार कोटींचा मद्य घोटाळा, ५०० कोटींचा सिमेंट घोटाळा, ५ हजार
    कोटींचा तांदूळ घोटाळा, १३०० कोटींचा गौठान घोटाळा, ७०० कोटींचा डीएमएफ घोटाळा केला. छत्तीसगडला लुटण्यात काँग्रेसने कोणतीही कसर ठेवली नाही, असा आरोप मोदींनी केला. तसेच राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व घोटाळ्यांची कसून चौकशी करून जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भ्रष्टाचार करून स्वतःचे खिसे भरणे हीच काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेसने नेहमीच गरीबांचा विश्वासघात केला आहे, असे मोदी म्हणाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Free ration for another five years; Prime Minister Narendra Modi's announcement
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif