पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ६ जी मिशन लाँच

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात 5G ची घोषणा झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच भारत 6G स्वीकारण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंटचे अनावरण केले आणि 6G चाचणीचीही घोषणा केली.

 

6जी विजन डॉक्युमेंट सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, ‘तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे भारताचं दशक आहे. भारताचं टेलिकॉम आणि डिजिटल मॉडेल सुरक्षित आणि पारदर्शक आहे.’ भारताचं 6 जी विजन डॉक्युमेंट 6जी (टीआयजी-6जी) टेक्नोलॉजी इनोव्हेशन ग्रुपने तयार केला आहे. या ग्रुपची स्थापना नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती.

‘भारतात प्रत्येक महिन्याला 800 कोटी रुपयांची देवाणघेवाण युपीआयच्या माध्यमातून होते. प्रत्येक दिवशी 7 कोटी ई- अथॉन्टिकेशन होत आहे. 28 लाख कोटी रुपये थेट बेनफिट ट्रान्सफरच्या मदतीने नागरिकांच्या खात्यात पाठवले जात आहेत. 5 जी सेवा सुरु केल्यानंतर 6 जी सेवेची आपण चर्चा करत आहोत. हे भारताचं भविष्य सांगत आहे.’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.